Ad will apear here
Next
‘आचार्य अत्रे साहित्य दर्शन’ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद
पुणे : लेखक, विडंबनकार, नाटककार, झुंजार पत्रकार, घणाघाती वक्ते, शिक्षणतज्ज्ञ, उत्तम चित्रपट कथाकार, निर्भीड राजकारणी आणि जागरूक समाजसुधारक असे विविध पैलू लाभलेले आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक असामान्य, उत्तुंग व्यक्तिमत्त्व! आचार्य अत्रे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आचार्य अत्रे साहित्य दर्शन हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या गाजलेल्या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे कलाकार माधव वझे यांच्या हस्ते झाले.  

सुहास बोकील यांनी या प्रदर्शनातील साहित्याचा संग्रह केला आहे. १३ आणि १४ ऑगस्ट असे दोन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनात अत्रे यांच्या हस्ताक्षरातील लेख,  संहिता,  तसेच १९६० च्या दशकात प्रकाशित झालेले वृत्तपत्रांचे काही दुर्मीळ अंक, अत्रे यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला ‘मराठा’चा विशेषांक आणि पु. ल. देशपांडे व इतर मान्यवरांनी अत्रे यांना वाहिलेली श्रद्धांजली आदी साहित्य ठेवण्यात आले होते. मोठ्या संख्येने साहित्यप्रेमींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लावली होती. 

(या प्रदर्शनाची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZVNCD
Similar Posts
मी ‘पुलं’चा एकलव्य : अशोक सराफ पुणे : ‘‘पुलं’चा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला, तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. साहित्यातून पात्र उभे करण्याची ‘पुलं’ची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशस्वी ठरलो आहे. मी ‘पुलं’चा एकलव्य आहे.
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. १२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. यानिमित्त पु. ल. कुटुंबीय, कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘एक पुलकित सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी
‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त गप्पा-आठवणी-गाण्यांची ऑनलाइन मैफल (व्हिडिओ) पुणे : पुण्यभूषण पुरस्कारासाठी सात-आठ नावे भाईंनी सुचवली होती... ‘‘पुलं’मुळेच माझे वक्तृत्व बहरले,’ असे तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी सांगितले होते... ‘‘पुलं’ची ओळख मी करून देणार,’ असं सांगण्यासाठी कवयित्री शांताबाई शेळके यांनी निनावी फोन केला होता.... पु. ल. देशपांडे यांच्या अशा अनेक आठवणींना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language